बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटचा आगामी चित्रपट “थलायवी” 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या चित्रपटाचे अधिकार 55 कोटी रुपयांना विकले गेले असल्याचे वृत्त आहे.
या चित्रपटात कंगना रनोट दिवंगत अभिनेत्री आणि मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.ए. एल विजय दिग्दर्शित या चित्रपटात कंगनासह अरविंद स्वामी, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन आणि मधु बाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


