सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे.गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12 पूर्णांक 75 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 84.125 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 06(68), सावंतवाडी – 12(133), वेंगुर्ला – 12(26), कुडाळ – 03(54), मालवण – 29(136), कणकवली – 32(44), देवगड – 05(97), वैभववाडी – 03(115), असा पाऊस झाला आहे.