कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुरुवारी सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सायंकाळी पाच वाजता सातफेरे घेतले आणि विवाहबंधनात अडकले. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. विकी कौशलने रात्री 8.30 च्या सुमारास त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोतअशी एक नोटही विकीने या फोटोंसोबत विकीने लिहिली आहे.
विकी वरात घेऊन कतरिना सध्या मुक्कामाला असलेल्या राणी पद्मावती महलासमोर पोहोचला होता. सुरक्षा रक्षकांनी राजवाडा आणि खिडक्या काळ्या कपड्याने झाकल्या आहेत, जेणेकरून कोणीही वधू-वरांचे फोटो, व्हिडिओ काढू नये.लग्नात नो फोन पॉलिसी असताना सोशल मीडयावर लग्नाशी संबंधित काही ना काही तरी व्हायरल होत आहे. विकी-कतरिना यांच्या नावाच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. कतरिनाच्या फॅन पेजवर हे कार्ड शेअर झाले आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजता विकी-कतरिनाचा हळदी सोहळा पार पडला. दोघांनी हळदी समारंभात पिवळे कपडे परिधान केले होते. यानंतर दिवसभर पाहुण्यांची ये-जा फारशी नव्हती. हॉटेल सिक्स सेन्समध्ये संध्याकाळी 7 वाजता संगीत सोहळा झाला. संपूर्ण किल्ला रोषणाईने सजवण्यात आला होता.