कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्याची गळफास लावून आत्महत्या केले आहे. सौजन्या कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने टीव्हीबरोबरच साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती.त्यामुळे ही बातमी कन्नड इंडस्ट्रीसाठी धक्कादायक आहे.
सौजन्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये नैराश्याने ग्रस्त असल्याचे कबूल केले आहे.अभिनेत्रीने सुसाईड नोटमध्ये तिच्या निर्णयाबद्दल तिच्या पालकांची माफी मागितली आहे. तिने लिहिले, “माझे प्रिय कुटुंब, मी माझ्या या निर्णयाबद्दल क्षमा मागते.” पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि अभिनेत्रीचे कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की अभिनेत्रीने स्वतः हे टोकाचे पाऊल उचलले की तिला आत्महत्येस प्रवृत्त केले गेले. या चिठ्ठीत सौजन्याने वाईट काळात तिला साथ देणाऱ्या सर्व सहका-यांचे आभार मानले आहेत.


