नवी दिल्ली- केंद्र सरकार लवकरच कोडीन आधारित कफ सिरपच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीचा निर्णय घेऊ शकतं. यासंदर्भातील धोरणाचा सध्या आढावा घेतला जात आहे.
कफ सिरपचा औषधापेक्षा नशेसाठी जास्त वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. कोडीन असलेल्या कफ सिरपवर बंदी घालण्याची मागणी या खासदारांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली होती. त्याआधारे आरोग्यमंत्र्यांनी मार्चमध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) या प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यास सांगितलं होतं. आता DCGI ने आढावा अहवाल आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.


