टी-20 वर्ल्डकप 2021 नंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडल असून सलामीवीर रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. केएल राहुलकडे उपकर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे. आता T-20 न्यूझीलंडविरुद्धच्या सुरू होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माने पद स्विकारताच 8 क्रिकेटपटूंचा संघातून वगळण्यात आले आहे आणि संघात 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज अशी नवीन टीम असून येणाऱ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहेत. तीन सामन्यांची टी-20 मालिका येत्या 17, 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी खेळली जाणार आहे.
विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती. यामधून हार्दिक, वरुण आणि राहुल चाहरला वगळण्यात आलं आहे.