काँग्रेसचे आमदार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे निधन

0
86

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले आहे. चंद्रकांत जाधव यांचे पार्थीव दुपारी 1 वाजता कोल्हापूरमध्ये आणण्यात येणार आहे. चंद्रकांत जाधव यांना लाडाने अण्णा म्हटले जात होते. त्यांचे निधन झाल्याची बातमी पचवनं कोल्हापूरकरांवर खूपच कठीण जात आहे.

चंद्रकांत जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी थेट संपर्क होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू फुटबॉल खेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्यातून मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. दोन ते अडीच वर्षांच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या तसेच उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरकरांना मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here