काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस दिली आहे.नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी (ED)समन्स बजावले आहे
काँग्रेसने या नोटिशीवर प्रत्युत्तर देत हुकूमशहा घाबरला हे स्पष्ट आहे. आम्ही घाबरणार नाही, पक्ष आणि आपले नेतृत्व घाबरून झुकणार नसल्याचे म्हटले आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी म्हणाले की “हा एक मोठा आजार आहे. हा आजार विरोधी पक्षांना लक्ष्य करणारा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. ज्या व्यवहारांमध्ये पैशांची देवण घेवण देखील झाली नाही अशा प्रकरणातही मनी लाँड्रिंगचे आरोप केले जात आहेत. अशा गोष्टींवरून 2014-15 पासून कारवाई सुरू आहे. या अशाच गोष्टींसाठी इडीचा वापर केला जात आहे.