काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे शनिवारी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी आजारी आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या. सध्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी वढेरा इटलीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले – त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या काळात संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.


