काँग्रेस आमदार संजय यादव हे मध्य प्रदेशातील जबलपूरच्या बारगीचे आमदार आहेत. त्यांच्या 17 वर्षीय मुलानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आमदार संजय यादव यांच्या परवाना असलेल्या पिस्तुलमधून गुरुवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
विभव हा बारगी येथील मदन महल स्कूलमध्ये 12 वीत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे तो मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. विभलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, ‘ माझे आई-वडील खूप चांगले आहेत. माझे सर्व मित्र खूप छान आहेत. पण, माझा एक अत्यंत जवळचा मित्र या जगात नाही, तो वर गेला आहे. आता मी पण त्याच्याकडे जात आहे. आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये. विभवने ही सुसाईड नोट आपल्या इतर 5 मित्रांना मेसेज केली होती. तुम्ही लोक खूप चांगले आहात, आता मी निघतो, असं देखील विभवने मेसेजमध्ये म्हटलं आहे.’
विभवने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली तेव्हा तो घरात एकटाच होता. त्याची आई काही कामानिमित्त भोपाळला गेली होती. तर आमदार वडील बैठकीसाठी बाहेर होते. घटना घडली तेव्हा विभव आणि नोकर हे दोघेच घरी होते. घराच्या पहिल्या मजल्यावरून पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. नोकर ताबडतोब धावतच वरच्या मजल्यावर गेला तेव्हा विभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला त्याला तात्काळ भंडारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी विभवला मृत घोषित केलं.