काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. पण, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण,अचानक प्रकृती खालवल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आई माजीमंत्री रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या खासदार सातव यांनी पंचायत समिती सदस्यापासून राजकिय प्रवास सुरु केला.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची फळी निर्माण केली. सन २००९ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभेेचे आमदार झाले.हिंगोली लोससभा मतदार संघातून त्यांना सन २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले.सन २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली.त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.