कांदिवलीतील एकाच इमारतीत आढळले करोनाचे १७ रुग्ण !

0
116
H3N2 विषाणू
H3N2

मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका सज्ज झाली आहे. मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टय़ा, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करून त्या निर्जंतूक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस आहे.

त्यातच मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एकाच इमारतीत करोनाचे १७ रुग्ण आढळल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे.कांदिवलीतील रहिवाशांसाठी आणखी एक चिंता म्हणजे महापालिकेला पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार पूर्व भागात आणि एक पश्चिम भागात आहे.

“लोकांनी करोनाला हलक्यात घेऊ नये. सण असेल तर एकत्र जमा होणे टाळायला हवं. आम्ही आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक काम करत आहोत. आम्हाला १७ कोविड रुग्ण आढळल्यानंतर महावीर नगर येथील सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.इमारतीतील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोत .” असे आर दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here