अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भर कॅश घेऊन गेले. अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष सालेह सुद्धा रविवारीच अफगाणिस्तान सोडून कझाखस्तानला गेले आहे.यामध्ये त्यांच्या जवळच्या अधिकारी आणि समर्थकांचा देखील समावेश होता.ते नेमक्या कुठल्या विमानातून पसार झाले किंवा नेमके कुठे आहेत याचा पत्ता अद्याप कुणालाही नाही.
गनी यांनी एक फेसबूक पोस्ट केली. त्यामध्ये अफगाणिस्तानात थांबले असता अधिक रक्तरंजित संघर्ष झाला असता. तोच टाळण्यासाठी आपण देश सोडल्याचे गनी म्हणाले आहेत. सोबतच, तालिबानने देशात शांतता बहाल करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.