कासार्डेत माघी गणेश जयंती उत्सवात प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा लक्ष्मण गुरव यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

0
36
कासार्डेत माघी गणेश जयंती उत्सवात प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा लक्ष्मण गुरव यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कासार्डे तिठा शिवसेना शाखा येथे माघी गणेश जयंती उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. माघी गणेश जयंती निमित्त याठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा लक्ष्मण गुरव यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कासार्डे शिवसेना विभागप्रमुख उपसरपंच बाबू पेडणेकर, विजय धुरी, बाळा पेडणेकर, सचिन आचरेकर, महेश देसाई, चेतन सावंत, राकेश पवार, श्रीधर परब, माया पेडणेकर, अनिकेत साटम, आत्माराम चव्हाण, महादेव सकपाळ आदि शिवसैनिक उपस्थित होते.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here