प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ : कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टीने गेले कित्येक दिवस ग्रामीण फेऱ्या सुरु करण्याबाबत सतत पाठपुरावा केला होता .एस टी महामंडळाची भारमानाची अट असल्याने गाड्या सुरु करणेबाबत अडचणी होत्या . वस्तीच्या गाड्या सुरु झाल्यास गाडयांना भारमान मिळेल अशी भूमिका भाजप कुडाळने घेतली होती त्याला विभाग नियंत्रकांनी तत्वतः मान्यता दिली असून मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने ग्रामीण वस्तीच्या फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात भोगवे,शिवापूर व घोटगे वस्ती चालू होतील ,त्यांनतर निवती,कुसगाव, केळूस मोबार होणार असून काही जवळच्या फेऱ्याही ४. ०० वाजल्यानंतर लॉक डाऊन असल्याने परतीच्या गाड्या ५ च्या दरम्यान सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. आज माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर ,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,शहर अध्यक्ष राकेश कांदे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर ,कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश बेळणेकर व शक्ती केंद्र प्रमुख निलेश परब यांनी आज प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांचीभेट घेतली यावेळी एस टी प्रशासनाचे अधिकारी गौतमी कुबडे ,विशाल देसाई ,अशोक राणे तसेच स्थापत्य विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा पाटील उपस्थित होत्या .या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर यांनी भेट घेतली होती त्या अनुषंगाने प्रभारी विभाग नियंत्रकांशी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी चर्चा केली.
माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी ग्रामीण फेऱ्या बाबत सूचना केल्या व भाजप कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या फेऱ्याबाबतचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने सुरु कसे करता येईल याबाबत चर्चा केली .ओंकार तेली यांनी तहसीलदार कुडाळ यांच्याशी चर्चा केली त्यांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . निलेश तेंडुलकर यांनी लांब पल्ल्याचा गाड्याविषयी कुडाळ आगारवर होणाऱ्या अन्याय संदर्भात आपले म्हणणे मांडले . कुडाळ येथील प्रवासी भिजत गाडीत चढतात याबाबत राकेश कांदे यांनी प्रश्न उपस्थित केला असता गिरीजा पाटील यांनी येत्या ८ दिवसात शेडचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बैठक व्यवस्था वाढविण्यासाठी उपायोजना करण्यासाठी बंड्या सावन्त यांनी सूचना दिल्या. फेऱ्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत आनंद शिरवलकर यांनी आपण त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले. तसेच 10 एप्रिल पासून लॉक डावून झाल्याने कुडाळ आगारातील३४६ मासिक व ८१ त्रैमासिक पासाना मुदत वाढवण्याबाबत १३ एप्रिलला निवेदन देऊन मागणी केली होती विभाग नियंत्रकांनी ती तात्काळ मान्य केली त्यामुळे 500 पेक्षा जास्त प्रवाशांचा फायदा भारतीय जनता पार्टी मुळे होणार आहे. प्रवाशानी आणि ग्रामस्थांनी टप्प्याटप्प्याने सुरु होणाऱ्या ग्रामीण एस टी फेऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येत आहे.
याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने कुडाळ बस स्थानक व आगाराचे दूरध्वनी कायमस्वरूपी बंद असल्याने बी एस एन एल कडून मोबाईल कनेक्शन घेवून येत्या आठ दिवसात संपर्क क्रमांक जाहीर करावा अशी मागणी केली .यापुढे सुरू होणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक व्हॉट्सॲप वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावे अशी मागणी करण्यात आली आहे.