मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदावर सुद्धा निवड होणार असून आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
यासोबतच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाबाबतही काँग्रेस पक्षात चर्चा सुरू आहे. नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद आणि प्रणिती शिंदेंना एखादं राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.