केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना युट्यूबवरुन दरमहा 4 लाख रुपये रॉयल्टी मिळते अशी माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी दिली.कोरोना साथीच्या काळात यूट्यूबवर टाकलेल्या त्याच्या व्याख्यानांशी संबंधित व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे यूट्यूबकडून येणारे पैसे देखील वाढले आहेत.
या काळामध्ये मी शेफ झालो होतो. त्यामुळे घरात स्वयंपाक करीत होतो. याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर देत होतो. या काळात मी जवळपास 950 लेक्चर दिले. यातील अनेक लेक्चर्स परदेशातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. या व्हिडिओचा वाचकवर्ग खूप वाढत गेला.