केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.यामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांच्य महागाई भत्त्यात आणखी 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांनी वाढला आहे.अशी माहिती माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. महागाई भत्त्याबरोबरच इतर अलाउंसमध्ये देखील वाढ होनार आहे. यामध्ये ट्रॅव्हल, सिटी अलाउंसचा समावेश आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडेंट फंड आणि ग्रॅच्युटीमध्येही वाढ होनार आहे. जर मूळ वेतन १८००० रुपये असल्यास ३ टक्क्यांप्रमाणे डर महिन्याला ५४० रुपयांची वाढ होणार आहे .
एका वर्षात किमान किती होईल लाभ?
सातव्या वेतन आयोगाच्या शिफरसीनुसार, तुमचं मुळ वेतन 18,000 रुपये आहे. तर 3 टक्क्याप्रमाणे तुमच्या वेतनात महिन्याला 540 रुपये वाढ होईल. तर तुमचं मुळ वेतन 25,000 रुपये असेल तर 750 रुपयांचा प्रतिमहिना लाभ मिळेल.याचा लाभ सुमारे एक कोटींहून जास्त कर्मचारी आणि पेंशनधारकांना मिळणार आहे


