‘कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा’-आमदार ऍड आशिष शेलार

0
113

तौकते चक्रीवादळाने कोकणपट्टीवर आंबा, नारळ,सुपारी, केळी आदी बागांचे,झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शेकडो बागायतदारांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.या सर्व झाडांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा उभी करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार ऍड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्ररूपाने केली आहे.

यामध्ये लिहिताना त्यांनी अशा पद्धतीने झाडांचे पुनरुज्जीवन करताना दाभोळकर तंत्रज्ञानाची मदत घ्यावी असे म्हंटले आहे.तसेच हे तंत्रज्ञान वापरताना कृषी विद्यापीठतील व मुंबई महानगर पालिकेतील उद्यान विभागाच्या तज्ञांना प्रात्यक्षिक दाखवावे लागेल असेही सांगितले आहे.शिवाय हे काम वादळ संपल्यानंतर लगेचच सुरु करणे आवश्यक आहे असेही म्हंटले आहे.

दाभोळकर तंत्रज्ञानात कमीत कमी ४ x ४ फूट खड्डा खोडवा लागतो किंवा जेवढी झाडांच्या मुळांची लांबी असेल त्या लांबीएवढा खड्डा खोदून लाल माती आणि त्या भागात असलेल्या वनराईची वाळलेली पाने आणि काटक्या त्याचे स्तर रचून एका सपोर्टच्या मदतीने झाड उभे करण्यात येते. त्यानंतर त्याला दर आठवड्याला तीन ते पाच लिटर अथवा झाडाच्या बुंध्याचा अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी देण्यात येते. हे दिल्यानंतर झाडाची मुळे विशेषतः आंब्याची मुळे आपोआप जमिनीत रुजतात व पहिल्या वर्षीच पाने यायला सुरुवात होतात आणि दोन ते तीन वर्षात उत्पादन सुरू होते.पाच वर्षाच्या आत ५०% अंदाजे उत्पादन होऊ शकते आणि दरवर्षी उत्पादन वाढत जाते. यापद्धतीने आंबा, नारळ, काजू व इत्यादी अनेक फळ झाडांना आपण पुनर्जीवित करू शकू. मात्र यासाठी फोर्स लिफ्टस आणि क्रेन या तातडीने पाठवून काम सुरु करावे असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होईल असे त्यांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here