सिंधुदुर्ग– जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि.मी. पाऊस झाला आहे. पुढील ५ दिवस दिनांक १५ जुलै ते १९ जुलै पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.कोकण,मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.रायगड,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग,मुंबई,पालघर ,ठाणे येथे अतिवृष्टीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 140(1895), सावंतवाडी – 190(2076.10), वेंगुर्ला – 159.80(1577.20), कुडाळ – 164(1756), मालवण – 198(2118), कणकवली – 146(1930), देवगड – 144(1687), वैभववाडी – 112(1865), असा पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 2 हजार 118 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 1 हजार 577 पूर्णांक 20 मि.मी. झाला आहे.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 11 हजार 808 क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यामध्ये सांडवा – 11 हजार 473, कलवा – 229 आणि विद्युत प्रकल्प – 105 क्युसेक्स असा विसर्ग आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 383.4010 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.70 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 169.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यातील 28 पैकी 17 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले असून देवगड तालुक्यातील कोर्ले – सातंडी हा मध्यम प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसात धरण भरल्याची टक्केवारी आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 62.4510 (63.71), अरुणा – 43.6907 (56.60), कोर्ले- सातंडी – 25.4740(100). लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480 (100), नाधवडे – 2.7249(62.38), ओटाव – 1.5199(32.48), देंदोनवाडी – 1.0744(10.96), तरंदळे – 0.8680(19.04), आडेली – 1.2880(100), आंबोली – 1.7250(100), चोरगेवाडी – 2.8090(87.78), हातेरी – 1.9630 (100), माडखोल – 1.6900(100), निळेली – 1.7470(100), ओरोस बुद्रुक – 1.9140(79.55), सनमटेंब – 2.3900(100), तळेवाडी – डिगस – 1.3050(52.12), दाभाचीवाडी – 1.9380(80.05), पावशी – 3.0300(100), शिरवल – 3.6800(100), पुळास – 1.5080(100), वाफोली – 2.3300(100), कारिवडे – 1.3850(100), धामापूर – 2.4410(100), हरकूळ – 2.3800(100), ओसरगाव – 1.1230(83.87), ओझरम – 1.8190(100), पोईप – 0.8370(71.97), शिरगाव – 0.8520(53.86), तिथवली – 1.7230(100), लोरे – 2.6960(100) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.