कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रविवारपासून तीन ते चार दिवस पावसाचा जोर

0
138

मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मराठवाड्याच्या परिसरात असलेली वाऱ्यांची चक्रीय स्थिती यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, हे क्षेत्र तीव्र होऊन पश्चिाम-उत्तर दिशेने सरकणार आहे. यामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोकण विभागात पाऊस राहणार आहे. १२ सप्टेंबरपासून काही भागांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १३, १४ सप्टेंबरला किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. १३ सप्टेंबरला कोकण विभाग आणि पश्चिाम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here