कोकण: गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी ‘रेल्वे गणपती उत्सव विशेष गाड्यांचा’ विस्तार

0
132

कोकणाचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव! यासाठी चाकरमानी मोठ्या उत्साहाने आपल्या गावाकडे जातो . गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे चाकरमान्यांना गावी जाता आले नव्हते.पण यावर्षी कोरोनाचे लसीकरण आणि नियमांचे पालन करत चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होता. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षीपेक्षा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त होती. अनेकांना आरक्षण, तिकीट मिळाले नाही. आता या गणेशभक्तांच्या जातानाच्या प्रवासामध्ये आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कसह विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या 15 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.

गणपती उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार – विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.कोविड 19 शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करीत या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.


– 01261 ​​पनवेल – चिपळूण विशेष गाडी दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
– 01262 चिपळूण – पनवेल विशेष गाडी दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे – 01257 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 14 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16 सप्टेंबर 2021 पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आले आहे.
– 01258 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17 सप्टेंबर 2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे. – 01259 पनवेल – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17 सप्टेंबर 2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.
– 01260 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी दिनांक 14 सप्टेंबर 2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16 सप्टेंबर 2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

वरील विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 12 सप्टेंबर 2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here