कोकण: लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम

0
21
लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यात संपन्न झालेल्या लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला-खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी बाजी मारली आणि राज्यस्तरावरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. https://sindhudurgsamachar.in/कोकण-इंग्रजी-व्याकरण-मार/

आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून ‘युवक आजचे भविष्य उद्याचे‘ या  विषयाचा वेध घेताना वास्तव विषयावर त्यांनी केलेले भाष्य अनेकांना प्रभावित करणारे ठरले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी तब्बल २३२ वेळा पहिला क्रमांक मिळवला असून निंबध स्पर्धेत आतापर्यंत १४७ वेळा ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तर काव्य वाचन व लेखन स्पर्धेत ३८ वेळा प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला असून राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत ७ वेळा पहिला क्रमांक त्यांना मिळाला असून आतापर्यंत त्यांनी दशावतार कलावंत व कलेवर जवळपास १५० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत.

लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या या यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ व प्राचार्या बोवलेकर, उभादांडा न्यू इंग्लिश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र आडारकर-कामत, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव रमेश नरसुले, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, तसेच  दोन्ही संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रा.खानोलकर यांचे अभिनंदन केले.

फोटोओळी – वक्तृत्व स्पर्धेतील विजेते प्रा.वैभव खानोलकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here