जगभरात कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची चिंता वाढत असतानाच भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत सुमारे 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची 373 रुग्ण आढळून आल्याची नोंद करण्यात आली आहे.भारतात सापडलेले रुग्ण हे कर्नाटकात आढळून आले आहेत.
त्यापैकी एक 66 वर्षीय परदेशी नागरिक आहे, जो नुकताच दक्षिण आफ्रिकेत गेला होता, तर दुसरा बेंगळुरू येथील 46 वर्षीय आरोग्य कर्मचारी आहे. दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले. त्याच्या अहवालात ओमायक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. ICMR डीजी बलराम भार्गव यांनी सांगितलं, की, जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत.दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
66 वर्षीय परदेशी नागरिकाला हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 240 लोकांची तपासणी करण्यात आली, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या परदेशी नागरिकाने 27 नोव्हेंबरच्या रात्री 12:12 वाजता हॉटेलमधून टॅक्सी घेतली आणि विमानतळावर पोहोचल्यानंतर तो यूएईला रवाना झाला. बाहेर पडण्यापूर्वी त्या परदेशी व्यक्तीचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला की नाही हे महापालिकेने आपल्या अहवालात सांगितलेले नाही.
दुसरा रुग्ण भारतीय आरोग्य कर्मचारी असून त्यांना ओमायक्रॉनच्या दुसर्या प्रकाराची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे की त्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्याची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटली असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.