दिवाळीनंतर देशामध्ये कोरोनाची भीती वाढली आहे .कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात 24 तासांत 500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असून 24 तासांत 12,516 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी मास्क लावणे ,हात धुणे ,कामाव्यतिरिक्त बाहेर जाणे अजूनतरी टाळणे आवश्यक आहे.अजून सहा महिने कोरोनाचे निर्बंधांचे कडेकोट पालन जरुरीचे आहे.त्याशिवाय ज्यांनी अजूनही लसीकरण करून घेतले नाही त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लास घ्यावी असे आवाहन सरकार करत आहे.कोरोनाला घालवायचं असेल तर लसीकरण आणि निर्बंध नागरिकांनी पाळावेत.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 538 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 120 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 8 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 2 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 13 ,व्हेंटीलेटरवर 2 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत