राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध आजपासून म्हणजेच दिनांक १ एप्रिल पासून हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.परंतु कोरोनाचे निर्बंध हटले तरी मास्क वापरणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सांगितले आहे.येत्या २ तारखेला गुढी पाडवा, राम नवमी आहे, किंवा 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
परदेशात सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही, त्यांनी ती ताबडतोब घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. लसीकरणाचं लक्ष्य गाठण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.