कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लागलेली टाळेबंदी बघून चाकरमान्यांनी कोकणात येण्याचे ठरविले.अद्याप रेल्वे चालू असल्यामुळे कोकणातील लोकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला.मुलांच्या शाळाही आणि परीक्षाही online असल्याने मुंबईत राहण्यापेक्षा गाव गाठणे सोयीस्कर असल्याचे चित्र दिसत होते.
राज्यात शनिवार आणि रविवार कडक लॉकडाउन जाहीर झाले असल्याने जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणणे सक्तीचे केले होते.पण रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांची नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे स्थानकात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंदणी आणि आरोग्य तपासणीचे निर्देश दिले.
कणकवलीत लॉकडाऊन असल्याने एस.टी बंद होती तर रिक्षाही तुरळक होत्या त्यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांची मात्र उन्हात दमछाक झाली.