कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता ब्रेन स्ट्रोकची नवीन समस्या समोर येत आहे.कोरोनाच्या तिसर्या लाटेत, बिहारमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटने जास्त संसर्ग झाला आहे.संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांना ब्रेन स्ट्रोकपासून ते नसांच्या इतर समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.शनिवारी एकाच दिवशी ब्रेन स्ट्रोकची 8 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर नुकतेच 35 रुग्ण दाखल झाले आहेत. 15 दिवसांत ब्रेन स्ट्रोकचे 42 हून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत असे इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरनी सांगतिले आहे.
४० वयाच्या वरील लोकांसाठी पोस्ट कोविड ब्रेन स्ट्रोकचा धोका घेऊन आला आहे.कोरोना संक्रमणानंतर मेंदूच्या नसांवर मोठा प्रभाव पडत आहे.मेंदूच्या कमजोर नसा रक्तदाब वाढल्याने फाटत आहेत.वातावरण कधी खूप थंड होत आहेत तर कधी खूप उष्ण होत आहे, हे देखील एक कारण आहे.ब्लड प्रेशर आणि शुगरच्या मॉनिटरिंगमध्ये कमतरतेसह औषधीमध्ये निष्काळजीपणामुळे धोका वाढत आहे. कोरोना संक्रमणानंतर लोक निष्काळजीपणा करत आहेत ज्यामुळे धोका वाढत आहे.