कोरोनाच्या नव्या लाटेची चाहुल, नव्या व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; तज्ज्ञांनी दिला इशारा

0
20
H3N2 विषाणू
H3N2

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. केरळ वगळता बहुतेक राज्यांमध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि दैनंदिन पातळीवर संक्रमितांचा आकडे देखील कमी होत आहे. पण याचवेळी कोविडचा नवीन व्हेरिअंट देखील भारतात आढळून आला आहे. नुकताच ओमायक्रॉनच्या आणखी एका उप-प्रकाराचे रुग्ण देशात सापडले आहेत. या व्हेरिअंटला XBB असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यात ओडिशा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-गडगडाटी-पावसात-घरावर-वी/

भारतात येण्यापूर्वी XBB व्हेरिअंटचे रुग्ण याआधी युरोप आणि अमेरिकेतही सापडले आहेत. भारतात देखील नव्या व्हेरिअंटचे 50 हून अधिक रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. सिंगापूरमध्ये या प्रकारामुळे नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नवा व्हेरिअंट लोकांना वेगाने संक्रमित करू शकतो आणि लसीची प्रतिकारशक्ती देखील बायपास करू शकतो. अशा परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गातील-उसक्षेत/

दुसरीकडे, भारतात लोक कोरोनाची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणीही मास्क लावले जात नाहीत. अशा परिस्थितीत नव्या व्हेरिअंटमुळे कोविडची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात एपिडेमियोलॉजिस्ट डॉ जुगल किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमध्ये सतत उत्परिवर्तन होत असते. यामुळे, नवीन सर्व प्रकार येत आहेत. यापूर्वी, bf.7 प्रकार आला आहे, ज्याचे रुग्ण अमेरिका आणि चीनमध्ये आढलून आले आहेत. आता काही दिवसात XBB व्हेरियंटही आला आहे. कोरोना विषाणू स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी सतत नवनवीन रूपांमध्ये बदलत असल्याचे यावरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना महामारी आता संपली आहे, असे लोकांनी समजू नये. कारण नवीन प्रकार लोकांना उच्च धोका आणि आधीच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांना धोका पोहोचवू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here