एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आज एक चांगली बातमी आहे.राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटीला एक वर्ष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे शाळा ,कॉलेज आणि स्पर्धा परीक्षा गेल्या वेर्षभरात घेता आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले होते. त्यांच्या परिक्षेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. वयोमर्यादा ओलांडलेलेअनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. अशा सर्व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे
MPSC परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती. ती लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर एक वर्ष मुदतवाढ देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.


