निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपाला अखेर यश आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्ड संघटनेसोबत बैठक घेतली.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय काढला आहे.या निर्णयानुसार शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोरोना काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी प्रत्येकाला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने घेतेल्या निर्णयाचे शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टर्सनी स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. द


