महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु सुरु होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले आहे.