प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई- राज्यावरील कोरोनाचे संकट आता उग्र रुप धारण करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे राजकीय नेते, मंत्री यांच्यासह सेलिब्रेटीदेखील कोरोनाबाधित होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या चार पटीने वाढली आहे. दरम्यान, मुंबई शहरात ३०० पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील २० टक्के पेक्षा जास्त लोक हे कोरोनाबाधित आले आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भागात कंटन्मेंट झोन करण्यात आला आहे. माहिम आणि धारावी येथेही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ३०० पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे


