सलमान खान ‘राधे’चित्रपटाच्या कमाईचा एक भाग खर्च करणार ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स मदतीसाठी कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मदतीसाठी पुढे आले आहे. सलमान खानने झी एंटरटेन्मेंटसोबत मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राधे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी ईदच्या दिवशी थिएटरसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाच्या कमाईतील एक भाग ते कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देतील. यासाठी त्यांनी गिव्ह इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत, आवश्यक वैद्यकीय उपकरणे म्हणजेच ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स दान केले जातील.झी स्टुडिओने आरोग्य सेवा मूलभूत सुविधा वाढविण्याच्या दिशेने, 240+ रुग्णवाहिका, 46,000+ पीपीई किट्स, ऑक्सिजन ह्युमिडीफायर्स देण्यात आले होते. त्याचबरोबर, कंपनीने महाराष्ट्रातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 304 बेडचे कोविड हेल्थकेअर सेंटर (डीसीएचसी) तयार करुन ते दान केले.


