कोरोना विषाणूचा नवा Ay4 व्हेरिएंट अधिक धोकादायक

0
101

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत.त्यातच येणारे दिवस हे सणांचे असल्याने देशभर जरा आनंदी वातावरण पसरले आहे.कोरोनाची दहशत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता कोरोनाच्या नव्या विषाणूने देशाची चिंता वाढवली आहे. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये कोरोना विषाणू डेल्टा व्हेरिअंटचा नवीन स्वरूप AY-4 आढळले आहे.

आतापर्यंत इंदौरमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत होते पण आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.सध्या या रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे वृत्त हाती आले आहे. या व्हेरिएंटचे जगभरात रिसर्च सुरु असून, तज्ञांनी सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

इंदौरमध्ये सप्टेंबर महिन्यात 7 जणांनी कोरोनाची बाधा झाली होती. त्या सर्वांचे कोरोना अहवाल जीनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहे. या व्हेरिअंटचे रुग्ण महाराष्ट्रात एप्रिलदरम्यान आढळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here