कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन सर्वांचीच चिंता वाढविली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आता कुठे मार्गावर येत असतानाच हे संकट दिसू लागण्याने जगभर कोरोना नियम अधिक कडक करायला सुरुवात केली आहे.ब्रिटन, श्रीलंका आणि मालदीवसह अनेक देशांनी आफ्रिका दौऱ्यांवर बंदी लावली आहे.जपानने ओमिक्रॉनची धास्ती घेऊन सर्वच परदेशी प्रवाशांवर प्रवेश बंदी लावली आहे.ब्रिटनमध्ये 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना व्हॅक्सीनचा बूस्टर डोस दिला जाणार असे सूत्रांकडून समजते. ब्रिटन मध्ये 3 जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे.
अमेरिकेने आज सोमवारपासून आफ्रिकेतील विमानांवर बंदी घातली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडासह नेदरलँड्स पर्यंत पोहोचला आहे.नेदरलँड्समध्ये शुक्रवारी 61 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यातील 13 जणांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे.