मुंबई: जगभरात ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्ग वाढत असतानाच भारतात i कोरोनाचे रुग्ण बघता बघता वाढू लागले .कोरोनाच्या रुग्णवाढीत महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळविला आहे.त्यातच येत्या १५ जानेवारीपासून राज्य नाट्य स्पर्धा सुरु होणार होती. परंतु कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आणि राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून व स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी स्पर्धेत भाग घेणाऱ्या अनेक संघांनी ई मेलद्वारे व दूरध्वनीवरून शासनाला विनंती केली .हि विनंती लक्षात घेऊन शासनाने ही स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली आहे.विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाच्या त्यावेळी असणाऱ्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.


