क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण- आर्यन आणि त्याचे आर्थर तुरुंगातील जीवन

0
80

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टीत अटक झाली. त्यानंतर त्याला आर्यनचा क्वारंटाइन मध्ये ठेवले होते.इथपर्यंत सर्व ठीक होत. शारुखने ऍड. सतीश मानशिंदे आणि सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ केस चालविलेले ऍड. देसाई यांना आर्यन खानची केस चालविण्यास दिली.पण आर्यनच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. कोर्टाने त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आर्यनला पुढचे काही दिवस आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

आता त्याला आर्थर जेलमध्ये दुसऱ्या बराकमध्ये इतर कैद्यांसोबत राहावे लागत आहे. तुरुंगामध्ये प्रत्येक कैद्याला त्याची ओळख म्हणून एक नंबर दिला जातो. हा नंबर हीच त्या कैद्याची जेलमधील ओळख असते.असाच एक अंडर ट्रायल नंबर 956 आर्यनला जेलमध्ये देण्यात आला आहे.

जेलच्या नियमांनुसार, प्रत्येक कैद्याला एका महिन्याला फक्त 4,500 रुपयांचे कूपन मिळू शकते.त्याप्रमाणे जेलमध्ये आर्यन खानला तीन दिवसांपूर्वी मनी ऑर्डरच्या रुपामध्ये कूपन मिळाले होते. आर्यन खानच्या कुटुंबाकडून 11 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड जेल प्रशासनाला 4,500 रुपये प्राप्त झाले. या पैशांतून आर्यन खान जेलच्या कँटिनमधून सामान खरेदी करु शकतो. त्याने मागच्या दिवसामध्ये कूपनच्या माध्यमातून बिस्किट आणि पाण्याची बॉटल खरेदी केली होती. आर्यन खान तुरुंगातील जेवण आवडत नसल्याचे त्याने आपल्या घरी सांगितले आहे.

जेलमध्ये इतर कैदयांप्रमाणे त्याला कपडे घालावे लागणार होते.पण कारागृहातील माहितीनुसार आर्यन खान तुरुंगात खूप अस्वस्थ आहे. तो एकटाच शांत बसतो.कुणाशीही बोलत नाही अगदी त्याच्या मित्र अरबाज मर्चंटशी सुद्धा तो बोलत नाही. आर्यन तुरुंगाजवळून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला थांबवतो आणि त्यांना स्वतःबद्दल काही कळलं का असे विचारत राहतो. बऱ्याच वेळा आर्यन विचारतो की कोणी त्याला भेटायला आले आहे का?

तुरुंगातील नियमाप्रमाणे आर्यनला सर्व कैद्यांबरोबर सकाळी लवकर उठव लागत तसेच लवकर झोपवह लागत .या सगळ्या गोष्टींची त्याला अजिबात सवय नाही त्यामुळे या गोष्टी त्याला कठीण वाटत आहेत. आर्यनला पाहण्यासाठी तुरुंग अधिकारी चकरा मारत असतात. आर्यनला तुरुंगात काही मासिके आणि विज्ञानाची पुस्तकेही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here