क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण:अनन्या पांडेची 4 तास चौकशी,अनेक स्टार्स रडारवर

0
101

अनन्या पांडेची आज 4 तास चौकशी करण्यात आली. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अनन्या एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. अनन्याला तिच्या आर्यन खानशी ड्रग्स संदर्भात चॅट केल्याबद्दल प्रश्न विचारले. अनन्याला शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले होते, मात्र अनन्या दुपारी 2.30 वाजता तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचली.


एनसीबीच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, आर्यन खानच्या संपर्कात असलेल्या एका मोठ्या निर्मात्याची मुलगी, एका अभिनेत्याचा भाचा, एका मोठ्या अभिनेत्याची मुलगी आणि एका मोठ्या अभिनेत्रीची बहीणही एनसीबीच्या रडारवर आहे. आर्यनसोबतच्या त्यांच्या चॅटही आढळल्या आहेत. पण हे चॅट्स ड्रग्जसंदर्भात होते की नाही, याची माहिती समोर आलेली नाही. एनसीबीला आर्यनचे जे चॅट्स मिळाले आहेत, ते खूप जुने आहेत. यापैकी एकाने देश सोडला असल्याची माहितीदेखील एनसीबीला मिळाली आहे.

क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारी एजन्सी, एनसीबी, फक्त आर्यन खानच नाही तर इतर अनेक स्टार्स रडारवर आहेत. आर्यन खानपासून सुरू झालेला एनसीबीचा ड्रग्ज तपास गुरुवारी अनन्या पांडेच्या घरी पोहोचला आहे. असे म्हटले जात आहे की या प्रकरणात आणखी अनेक स्टार किड्स आहेत ज्यांची नावे देखील या प्रकरणात येऊ शकतात आणि एजन्सी त्यांची देखील चौकशी करू शकते. या यादीत पहिले आणि महत्त्वाचे नाव आहे अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचे. असे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कमाल आर खान यांनी म्हटले आहे.

केआरकेच्या मते, एनसीबीच्या रडारवर असलेली पुढची स्टार किड शनाया कपूर आहे. क्रूझ रेव्ह पार्टी या प्रकरणाची चौकशी करत आहे NCB लवकरच संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला चौकशीसाठी बोलावू शकते. एनसीबी त्यांना लवकरच समन्स बजावू शकते. शनाया कपूर देखील आर्यन खानच्या फ्रेंड सर्कलचा भाग आहे. शनाया कपूर आणि अनन्या पांडे या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या दोघीही आर्यन खानशी खूप अटॅच आहेत. या तिघांचे अनेक जुने फोटो व्हायरल झाले आहेत. शनाया ही आर्यनच्या प्रत्येक पार्टीचा भाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here