क्रूझवरील ड्रग पार्टी:मुंबई पोलिस पाठलाग करत असल्याचा आरोप NCB च्या समीर वानखेडेचा आरोप

0
116

क्रूझवरील ड्रग पार्टी छापा टाकल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकाऱ्यांकडून मुंबईत कसून तपास सुरू आहे.मुंबई पोलिस पाठलाग करत असल्याचा आरोप NCB च्या समीर वानखेडेचा आरोप केला. या संदर्भात NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. समीर वानखेडे यांच्या या आरोपामुळे मुंबईतील ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी NCP वर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर समीर वानखेडे प्रकाशझोतात आले आहेत.

ड्रग पार्टी प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू असताना आता वानखेडे यांनी स्वत: मुंबई पोलिसांकडे एक तक्रार केली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, अशी वानखेडे यांची तक्रार आहे. याबाबत वानखेडे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक हेंमत नगराळे यांची भेट घेतली.आपल्यावर पाळत ठेवण्याची तक्रार करताना समीर वानखेडे यांनी काही पुरावे देखील सादर केले आहेत. तसेच काही सीसीटीव्ही फूटेजही मुंबई पोलिसांकडे सोपवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here