क्रूझ ड्रग्ज पार्टी: ड्रग पॅडलरसमोर होणार आर्यनची चौकशी

0
97

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले की, प्रसिद्ध होण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नियम मोडण्याचा अधिकार मिळेल. दरम्यान, समीर आणि त्यांच्या टीमवर बॉलिवूडला लक्ष्य केल्याच्या आरोपांनाही सामोरे जावे लागत आहे. यावर समीर वानखेडे म्हणाले की, अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे असे म्हटले जाते की, आम्ही बॉलिवूडला लक्ष्य करत आहोत, पण सध्या कल्पनांवर बोलू नका, आता तथ्यावर बोलू आणि सर्वात महत्वाचे आकडे आहेत.

या प्रकरणात पकडलेल्या पॅडलरच्या चौकशी दरम्यान, त्याला ‘डार्क नेट’ वर ड्रग्जचा पुरवठा करणाची ऑर्डर मिळाली होती. आणि आरोपींनी बिटकॉईनमध्ये पैसे दिले होते, असे उघड झाले आहे. ‘डार्क नेट’ हे इंटरनेटचे काळे जग आहे, जिथे तुम्ही शस्त्रांपासून ते ड्रग्जपर्यंत सर्वकाही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. यामध्ये ऑर्डर आणि डिलिव्हरी व्यक्तीचा मागोवा घेणे खूप कठीण आहे. हेच कारण आहे की हे पॅडलर्स आर्यनला पकडल्यानंतर 3 दिवसांनी एनसीबीच्या हाती लागले आहेत.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ आरोपांना 7 ऑक्टोबरपर्यंत क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांनाही एनसीबीकडून अटक झाल्याचे समजते. आतापर्यंत केवळ 11 जणांना अटक झाल्याची पुष्टी एनसीबीकडून करण्यात आली आहे. यामध्ये आर्यनसह क्रूझवर हजर आठ जण, अरबाज मर्चंटचा मित्र श्रेयस आणि जोगेश्वरी येथून एक जण आणि ओडिशातून एकाला अटक झाली आहे.

या दोघांवर रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. श्रेयस हा अरबाजचा खूप चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आज या दोघांची आर्यन, अरबाज आणि मुनमुनसह 8 आरोपींसमोर बसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात, NCB इतर काही ठिकाणी देखील छापे टाकू शकते.

आज त्यांना कोठडीसाठी किल्ला न्यायालयात हजर केले जाईल. याच प्रकरणात एनसीबीने क्रूझच्या 8 कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पार्टीची माहिती जाणूनबुजून लपवल्याचा आरोप आहे. असे मानले जाते की त्यापैकी काहींना आज अटक केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here