क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत निर्णय राखीव ठेवला आहे.त्यामुळे त्याला अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार आहेत. आर्यन खानसह इतर पाच आरोपींना क्वारंटाईन सेलमधून कॉमन सेलमध्ये हलवण्यात आले आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा हे देखील 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार आहेत .
आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. आर्यनचे वकील देसाई यांनी , एनसीबी वारंवार ड्रग्ज आणि रोख रकमेबद्दल बोलत आहेत, परंतु आर्यनकडून त्यांना काहीही सापडले नाही. आर्यनकडून ना चरस, ना एमडी किंवा कोणतीही गोळी किंवा रोख जप्त करण्यात आली आणि एनसीबीने अरबाजकडून फक्त 6 ग्रॅम चरस जप्त केले असा युक्तिवाद केला. तर एनसीबीच्या वकिलांनी त्यांच्या जामीनाला विरोध केला. दुपारी एक वाजल्यापासून एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
एनसीबीकडे आर्यन खान परदेशातील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आहेत.तसेच आर्यनशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय दुवे देखील सापडले आहेत. त्यात अवैध ड्रग्ज खरेदीचे संकेत दिसत आहेत.आर्यनला प्रभावशाली व्यक्ती आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर तो पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना आंतरराष्ट्रीय क्रूझ ग्रीन मुंबई येथे पकडले गेले, जिथे ते एमव्ही एम्प्रेस कार्डशिवाय प्रवेश करू शकत नाहीत. या सर्व बाबी तपासण्यासाठी तपास आवश्यक आहे असे सांगितले त्यामुळे न्यायालायने निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत निर्णय राखीव ठेवला आहे.