क्रूझ ड्रग्स प्रकरण: अखेर तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर

0
73

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल 27 दिवसांनंतर आज तुरुंगातून बाहेर आला आहे. आर्यनला नेण्यासाठी स्वतः शाहरुख खान तुरुंगाबाहेर हजर होता.मन्नतहून तीन एसयूव्ही गाड्या तुरुंगाकडे रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका कारमध्ये स्वतः शाहरुख होता. कागदोपत्री उशीर झाल्यामुळे तो शनिवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकला.

आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटला घेण्यासाठी त्याचे वडील अस्लम मर्चंटही आर्थर रोड जेलबाहेर पोहोचले होते. पण आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची आजही तुरुंगातून सुटका होणार नाही. त्यांची रिलीझ ऑर्डर प्रलंबित आहे.या दोघांना आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here