क्रोएशिया येथील विश्वचषक स्पर्धेत २५ मी एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या सरनोबत राहीने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!राहीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे
राहीमार्फत भारताने या स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली. भारताने याआधी एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली आहेत. ३० वर्षीय राहीने पात्रता फेरीत ५९१ गुणांसह दुसरे स्थान पटकावल्यानंतर अंतिम फेरीत ३९ गुण मिळवत पहिला क्रमांक प्राप्त केला. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेत राहीने अप्रतिम कामगिरी करत गुणांची लयलूट केली. फ्रान्सच्या माथिल्डे लॅमोल हिने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले. राही आणि तिच्या आईला कोविडच्या आजाराशी संघर्ष करावा लागला होता
.