महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.अर्जुन बिजलानीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे त्याने सांगितले आहे. अर्जुनच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या आईला मधुमेह आहे आणि ती देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. ती 70 वर्षांची आहे. आईची प्रकृती आता ठीक आहे, असेही त्याने सांगितले.
“कुटुंबापासून दूर राहणे ही समस्या नाही, समस्या ही आहे की मी एकाच घरात वेगळ्या खोलीत आहे. मी त्यांना मिठी मारू शकत नाही, त्यांना भेटू शकत नाही. काहीही नाही. मी माझा मुलगा अयानच्या जवळ जाऊ शकत नाही. मी त्याला माझ्या खोलीतून पाहतो, पण तो खूप दूर आहे. सध्या सुट्टीचा हंगाम आहे आणि आम्ही खूप नियोजन केले होते. पण ते सर्व व्यर्थ गेले.”असे तो एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाला