सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या नूकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलमधून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक भगवान जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सचिव विकास केरकर यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मच्छीविक्रेते-लवू-ओटवक/
यावेळी राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख, क्रीडा प्रशिक्षक दीनानाथ बांदेकर, राज्य पंच जितेंद्र म्हापसेकर, नंदन वेंगुर्लेकर, सुनील सावंत, सुभाष नाईक, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

