सिंधुदुर्ग: सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये आर.टी.ई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या वर्गात किंवा इयत्ता पहिलीमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 10 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला,मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. दरवर्षीप्रमाणे सन 2022-23 या आर.टी.ई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. या प्रक्रिया ही खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी (अल्पसंख्यांक शाळा वगळून) राबविण्यात येणार आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या पहिल्या वर्गामध्ये प्रवेश प्रक्रिया राबविणेसाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 49 शाळांनी नोंदणी केलेली असून 293 जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येणार आहेत.
बालकांच्या पालकांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावून प्रवेश अर्ज भरावयाचे होते. या कालावधीत 118 विद्यार्थ्यांनी पहिली प्रवेशासाठी अर्ज सादर केले आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागणार नाही. आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख असेल तेथे नमुद करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याबाबत व्हिडीओ व माहिती ही वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. सन 2021-22 च्या प्रवेश प्रक्रियेत इयत्ता पहिलीमध्ये 51 शाळांमधून 343 जागांपैकी 172 मुलांनी प्रवेश घेतलेला आहे. गटशिक्षणाधिकारी स्तरावर व शाळास्तरावर मदत केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. पालकांनी तेथे जावून काही अडचणी असल्यास मदत घ्यावी . विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रके तपासणीकरिता पडताळणी समित्या गठीत केलेल्या आहेत. या पडताळणी समिती मार्फत खालीलप्रमाणे कागदपत्रे प्रवेशाच्यावेळी पडताळणी समिती मार्फत केली जाणार आहे.
ऑनलाईन प्रवेशास पात्र बालके, विद्यार्थी वंचित घटक- एस.सी, एस.टी, ओ.बी.सी, इतर सर्व मागासवर्गीय घटक व अपंग व इतर प्रवर्गातील बालक. दुर्बल घटक – 1 लाख व त्या पेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंबातील बालक. निवासी पुरावा-निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सन्स, वीज, टेलिफोन देयक,प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी,गॅस बूक, बँक पासबूक, आधार कार्ड,मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ. यापैंकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. शासनाने यापूर्वी अधिसूचना अथवा शासन निर्णयाव्दारे जाहीर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यात यावे. विद्यार्थ्यांने दिलेला पुरावा गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख यांचे मार्फंत तपासण्यात येणार आहे. जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये आर.टी.ई.25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन 2020-21 व 2021-22 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा. उत्पन्नाचा दाखल्याकरिता सॅलरी सिल्प, तहसिलदारांचा दाखला, कंपनीचा किंवा ऍप्लोयर चा दाखला उत्पन्नाचा गृहीत धरण्यात यावा. दिव्यांग मुलासाटी वैद्यकिय प्रमाणपत्राचा पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकिय, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. पालकांनी ऑनलाअर्न प्रवेश अर्ज भरतांना सिंग्ल प्रिंण्ट (विधवा, घटस्पोटीत, आई अथवा वडील यापैंकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित व्यक्तिंचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल. वरील प्रमाणे कागदपत्रे ही विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल करताना सादर करावयाची असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना त्याचा उल्लेख करावा