देशातील मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) खासगी मेडिकल कॉलेज आणि डीम्ड विद्यापीठांसाठी ५० टक्के जागांसाठी फीचे नियम घालून दिल्यामुळे फायदा मिळणार आहे .या नियमामुळे आता खासगी मेडिकल कॉलेज या ५०% जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मर्जीप्रमाणे घेतली जाणारी कॅपिटेशन फी वसूल करू शकणार नाहीत. त्यांना या जागांसाठी राज्यातील सरकारी कॉलेजसाठी ठरवलेली फी घ्यावी लागणार आहे.
नव्या मेडिकल कॉलेजमध्ये कॉलेज सुरू केल्यापासूनच्या आधारतीत खर्चावर विद्यार्थ्यांची फी ठरेल. एमबीबीएस , पीजी कोर्स व रुग्णालयातील खर्चावरच फी ठरणार त्यामुळे या सर्वांचा विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे. देशातील बहुतांश सरकारी कॉलेजमध्ये वार्षिक सरासरी फी ५० हजार रु. आहे. तर खासगी कॉलेजांत ती १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.सरकारी फीचा लाभ मेरिटनुसार विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.


