सिंधुदुर्ग– गणेशोत्सवाच्या काळात मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी 1 वाजलेपासून 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.
दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिलक ऑक्सीजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना ही निर्बंध बंदी लागू राहणार नाही, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 115 मधील तरतुदींचा वापर करून महाराष्ट्र शासन गृह विभाग परिवहन यांच्या आदेशानुसार पनवेल ते इन्सुली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, पनवेल ते सिंधुदुर्गमार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी वरून होणारी वाळू/रेती भरलेले ट्रक, मोठ्या ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
14 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
8 सप्टेंबर रोजी 1 वाजल्यापासून 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वाळू, रेती वा तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंदी राहली.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इत्यादी ने आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तथापी वाहतूकदारांनी संबंधित वाहतूक विभाग / महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घ्यावे. वाहनचालकांनी या सूचनांचे काटोकोरपणे पालनकरून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे