🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी –
वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सलग तिस-या दिवशी ‘गरूडझेप महोत्सवाचे‘ आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी ९ वा. मीना पार्क-राऊळवाडा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले असून अधिक माहितीसाठी जयेश राऊळ (९६७३५०७९४४), हर्षद रेडकर (८८०५२३३५२२) किवा कौशल मुळीक (९४२११०१९४३) यांच्याशी संपर्क साधावा.https://sindhudurgsamachar.in/kokan-आरवली-सोन्सुरा-येथील-ज्य/
याच दिवशी रात्रौ ७ वा. नायरा पेट्रोल पंपासमोर वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘अहम् ब्रम्हांडजय‘ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दि. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून उपजिल्हा रूग्णालय, वेंगुर्ला येथे अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल (कोल्हापूर) व जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर रेडकर (७०५७२७८७२७), दिनेश पाटील (७२१९४८२७७७) किवा सागर शिरसाठ (७७७६९७०७३७) यांच्याशी संपर्क साधावा.
याचदिवशी सायंकाळी ७ वा. नायरा पेट्रोल पंपासमोर वेंगुर्ला तालुका मर्यादित ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहेत. प्रथम येणा-या १५ संघांना प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक संघामध्ये कमीत कमी पाच जण आवश्यक आहेत. नावनोंदणी मंगेश परब (८१४९६१७२०९), अनिकेत वेंगुर्लेकर (९१७२६३३७६९) किवा अनंत रेडकर (९६७३१२६५३५) यांच्याकडे करावी. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार तसेच आकर्षक चषक देण्यात येईल. रात्रौ ९ वा. महिलांसाठी होम मिनिस्टर आयोजित केली असून फक्त ५० महिलांनाच सहभाग घेता येईल. नावनोंदणी गौरव राऊळ (७८८८२००९११), रसिक वेंगुर्लेकर (७०५७९९६४४७) किवा रोहित रेडकर (९४०४७४९५९६) यांच्याकडे करावी.
दि. २ मार्च रोजी सकाळी १० पासून वेंगुर्ला शाळा नं.४ येथे जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा, तिसरी ते चौथीसाठी नाचणारा चोर, पाचवी ते सातवीसाठी स्वच्छता अभियान, आठवी ते दहावीसाठी डोंबा-याचा खेळ हे विषय ठेवण्यात आले आहेत. नावनोंदणी विवेक राऊळ (९७६४१४८१५२), चंदन रेडकर (८१८०८७८१४३) किवा लोकेश शिरसाट (९९७०२५२८०६) यांच्याकडे करावी. याचदिवशी सायंकाळी ७ वा. नायरा पेट्रोल पंपासमोर बक्षिस वितरण समारंभ व लकी ड्राॅ स्पर्धेचा निकाल, त्यानंतर रात्रौ ८ वा. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ यांचा ‘जलवा २०२५‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे केले आहे.